Rashmi Mane
23 जानेवारी राष्ट्रीय चळवळीचे पराक्रमी नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 127 वी जयंती आहे.
सुभाषचंद्र बोस यांनी हा दिवस "पराक्रम दिवस" म्हणून साजरा केला.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजींनी महत्त्वाची भूमिका बजावली. तरुणांमध्ये स्वातंत्र्यासाठी लढण्याची तळमळ निर्माण करण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे.
"तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा" अशा घोषणांमुळे नेताजींनी लोकांच्या मनामनात स्वातंत्र्याप्रती तळमळीची भावना निर्माण केली.
नेताजींचे व्यक्तिमत्व अफाट प्रगल्भ, ज्ञानी, अविश्वसनीय बुद्धिमत्ता आणि तेजस्वी होते.
नेताजींना स्वातंत्र्यासाठी 11 वेळा तुरुंगवास भोगावा लागला होता.
नेताजींवर स्वामी विवेकानंद आणि श्री रामकृष्ण परमहंस यांचा खूप प्रभाव होता.
नेताजी यांनी एमिली शेन्कीशी यांच्याशी विवाह केला होता. त्या ऑस्ट्रियन महिला होत्या.