Rashmi Mane
नावातच 'शक्ती' असलेली ही अधिकारी खरीखुरी 'दुर्गा' ठरली आहे!
IAS दुर्गा शक्ती नागपाल या 2010 बॅचच्या अधिकारी. त्यांनी आपल्या कार्यशैलीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले.
दुर्गा यांचा जन्म 1985 मध्ये आग्रा येथे झाला. त्यांनी संगणक अभियंता म्हणून शिक्षण घेतलं, पण निवडलं राष्ट्रसेवा क्षेत्र.
UPSC मध्ये यश मिळवून त्यांनी IAS अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
प्रामाणिकपणा व कठोर कार्यशैली त्यांची ओळख.
उत्तर प्रदेशात अवैध वाळू उत्खननाविरोधात कठोर कारवाई केली. या कृतीने अनेकांची झोप उडवली आणि चर्चेत आल्या.
2013 मध्ये त्यांचं निलंबन केलं गेलं, पण जनतेनं प्रचंड पाठिंबा दिला.
त्यांच्या समर्थनार्थ मोठा जनआंदोलन उभा राहिला होता.
दडपशाही, राजकीय दबाव आणि आरोप झेलूनही त्यांनी सत्याची बाजू सोडली नाही.
त्यांची निष्ठा आजही प्रेरणा देते.
IAS अधिकारी अभिषेक सिंग यांच्याशी विवाह. दोघंही प्रशासनात प्रामाणिक आणि निष्ठावान अधिकारी म्हणून ओळखले जातात.
Next: देशात मिळणार 3.5 कोटी नव्या नोकऱ्या, ELI योजना कशी करणार तुमचं भविष्य उज्वल! जाणून घ्या सविस्तर