सरकारनामा ब्यूरो
उत्तर प्रदेश केडरच्या आयएएस ईशा दुहान या 2014 बॅचच्या अधिकारी आहेत.
यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात 59 व्या रँकसह परीक्षा उत्तीर्ण केली होती.
ईशा यांना लहानपणापासूनच आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आठवीत असतानाच अधिकारी होण्याचा पक्का निर्णय घेतला.
बायोटेक्नाॅलाॅजीमध्ये पदवीचे शिक्षण घेत असताना शेवटच्या वर्षातच त्यांनी यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली होती.
पहाटे पाच वाजता उठून अभ्यास करत, कोचिंग क्लासनंतर काॅलेजला जाणे आणि त्यानंतरही अभ्यास करणे, असा त्यांचा रोजचा दिनक्रम होता.
पदवीच्या शेवटच्या वर्षात त्यांनी फक्त काॅलेजचा अभ्यास केला आणि पदवी शिक्षण पूर्ण करताच त्या दिल्लीला गेल्या.
तयारीदरम्यान त्यांनी ऑप्शनल विषयांमध्ये पास होण्याकडे लक्ष केंद्रित केले आणि त्यानुसार अभ्यास केला.
अभ्यासाबरोबर रोज वर्तमानपत्रांचेही वाचन त्या करत होत्या, जेणेकरून चालू घडामोडींची माहिती मिळत होती.
एनसीईआरटीच्या नवीन अभ्याक्रमांच्या पुस्तकांच्या अभ्यासाने त्यांना हे यश मिळवण्यात खूप मदत झाली, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.
R