सरकारनामा ब्यूरो
आयएएस नम्रता जैन या छत्तीसगडमधील दंतेवाडा या नक्षलग्रस्त भागातील आहेत.
नम्रता यांनी शालेय शिक्षण पूर्ण करून छत्तीसगड येथील भिलाई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक पूर्ण केले.
शालेय वयापासून नम्रताने 'आयएएस' अधिकारी व्हायचं स्वप्नं बघितलं आणि त्यासाठी अभ्यासाला सुरुवात केली.
'यूपीएससी' परीक्षेची तयारी करताना अनेक अडचणींना सामोरे जात नम्रता यांनी परीक्षेत यश मिळवले.
2016मध्ये 99वी रँक मिळवत दुसऱ्याच प्रयत्नात नम्रता 'यूपीएससी' परीक्षेत यश मिळवून मध्य प्रदेशच्या 'आयपीएस' अधिकारी झाल्या.
स्वप्नं पूर्ण करण्यासाठी 2018 मध्ये 12वा रँक मिळवत नम्रता जैन प्रशासकीय सेवेत दाखल झाल्या.
नम्रता या लहानपणापासून अभ्यासू आणि प्रचंड मेहनती आहेत.
छत्तीसगडमधील दंतेवाडा हा पूर्णपणे नक्षलग्रस्त भागात कोणत्याही सुविधा नसताना नम्रता यांनी हार न मानता त्यांचे स्वप्न पूर्ण केले.
अभ्यासासाठी नम्रता जैन या रोज भिलाई ते गीदाम 400 किलोमीटरचा प्रवास करत असे.