सरकारनामा ब्यूरो
आसामचे डॉक्टर मयूर हजारिका यांनी UPSC सिव्हिल सर्व्हिस परीक्षेत अव्वल स्थान पटकावले.
तेजपूरच्या डॉन बॉस्को हायस्कूल आणि रामानुजन कनिष्ठ महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले.
IFS (Indian Foreign Service) अधिकारी बनून देशातील विविध परराष्ट्र संबंधांवर काम करण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते.
मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात जाण्याचा पर्याय निवडला अन् डाॅक्टर बनले.
एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात असतानाच नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करुन त्यांनी अधिकारी व्हायचा निर्णय घेतला.
मानववंशशास्त्र हा ऐच्छिक विषय निवडून त्यांनी यश संपादन केले.
यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात 5 वी रँक मिळवून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
UPSC तयारी करत असताना 26 वर्षीय मयूर यांनी आरोग्य क्षेत्रातही उत्तम काम केले आहे.