Rashmi Mane
प्रत्येकाचे आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास इतरांपेक्षा वेगळा असतो. प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी जो तो आपापल्या परीनं अथक मेहनत घेत असतो.
संघर्षाला सामोरं जात विटा उचलण्याच्या कामापासून ते डीएसपी होण्यापर्यंतचा खडतर प्रवास संतोष कुमार पटेल यांनी केला आहे. त्यांचा प्रवास खरचं खूप खडतर होता, पण त्यांचे ध्येयापर्यंत पोहोचण्याची मेहनत नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.
मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील असणारे संतोष लहानपणापासूनच गरिबीचे साक्षीदार राहीले आहेत. त्यांचे वडील गवंडी आणि आई शेतमजूर यांच्याकडूनच ते कष्टाचं मूल्य शिकले.
संतोष पटेल केवळ सोशल मीडियावरच खूप लोकप्रिय नाहीत, तर आत्तापर्यंत त्यांचे जिथे जिथे पोस्टींग झाले, तिथे ते खूप लोकप्रिय आहेत.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सरकारी महाविद्यालयातून इंजिनीअरिंगमध्ये शिक्षण घेतले.
मात्र, इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण करण्यापूर्वीच त्यांचा अभ्यासातील रस कमी झाला होता. त्यामुळे त्यांनी इंजिनीअरिंग अर्धातच सोडले.
त्यानंतर त्यांनी 3 ऑगस्ट 2015 ला MP PSC परीक्षेची (MPPSC भर्ती) तयारी सुरू केली आणि शेवटी 1 ऑक्टोबर 2016 ला त्याची DSP पदासाठी निवड झाली.
संतोष पटेल सध्या ग्वाल्हेरमध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहेत. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.