सरकारनामा ब्यूरो
उत्तर प्रदेशाच्या बरेली जिल्ह्यातील सूर्य पाल गंगवार यांचा जन्म नवाबगंज तहसीलच्या बिथरी गावात झाला.
लहानपणी कलेक्टर शब्द केवळ ऐकला होता. मात्र जेव्हा त्याचा अर्थ कळला, तेव्हापासूनच त्यांना आयएएस होण्याचे वेड लागले.
सामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या मुलाने मोठी स्वप्न पाहणे हे खूप आव्हानात्मक होते. कारण त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या.
सूर्य पाल यांचे वडील अतिशय कठोर शिस्तीतले शिक्षक होते. त्यामुळे त्यांना कायम वडिलांचा आदर होता.
नवाबगंजच्या खासगी शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे शिक्षण तर 1986 मध्ये उघडण्यात आलेल्या बरेली नवोदय विद्यालयाच्या पहिल्या बॅचमध्ये त्यांनी 6 वीत प्रवेश घेतला.
निवासी शाळा असूनही सुरुवातीला शाळेत सुविधांची कमतरता असल्याने डीएम आणि इतर प्रशासकीय अधिकारी वारंवार भेट देत असत, ज्यामुळे त्यांना डीएम बनण्याची प्रेरणा मिळाली.
बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीमध्ये करिअर करण्यासाठी IIT रुरकीमध्ये प्रवेश घेतला.
कौटुंबिक परिस्थितीमुळे आयएएसची तयारी न करता त्यांनी नोकरी करण्याचे ठरवले. बी.टेक पूर्ण करताच त्यांनी नामवंत कंपन्यांमध्ये अनेक वर्षे नोकरी केली.
यूपीएससीत पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना अपयश, नंतर 476 व्या क्रमांकाने आयआरएस (भारतीय महसूल सेवा) मध्ये निवड आणि शेवटी 8 व्या रँकसह ते IAS झाले.