Roshan More
आरएस प्रवीण कुमार हे 1995 ला यूपीएससीची परीक्षा देत IPS झाले.
आरएस प्रवीण कुमार यांचा जन्म 23 नवंबर 1967 ला तेलंगणातील जोगुलम्बा गडवाल जिल्ह्यातील आलमपूर गावात झाला.
आरएस प्रवीण कुमार यांचे आई वडील शिक्षक होते. दलित समाजातील असलेल्या प्रवीण कुमार यांना लहानपणी सामाजिक भेदभावाचा सामाना करावा लागला.
सामाजिक काम करण्यासाठी आरएस प्रवीण कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
आरएस प्रवीण कुमार यांनी बसपामध्ये प्रवेश करत राजकीय जीवनाला सुरुवात केली. ते बसपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार होते.
प्रवीण कुमार यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी भारत राष्ट्र समिती ( बीआरएस) या पक्षात प्रवेश केला.
प्रवीण कुमार तेलंगणात सुमारे 300 समाजकल्याण निवासी शैक्षणिक संस्था चालवतात. यामध्ये अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.
प्रवीण कुमार यांच्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गरीब घरातील अनेक विद्यार्थीक विद्यार्थ्यांना आयआयटी आणि आयआयएम सारख्या प्रतिष्ठितसंस्थांमध्ये प्रवेश मिळाला आहे.