सरकारनामा ब्यूरो
नक्षलवादी विरोधात लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे IPS विशाल गुन्नी हे 2010 च्या बॅचचे अधिकारी आहेत.
विशाल हे मूळचे कर्नाटकच्या बंगळुरू येथील आहेत.
2010 मध्ये ते IPS झाले आणि आता ते उच्च पदावर कार्यरत आहेत.
वरिष्ठ पोलिस अधीक्षक पदानंतर ते विजयवाडा शहरात पोलिस उपायुक्त या पदावर कार्यरत होते.
प्रामाणिक आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची वरिष्ठ पोलिस अधीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
विशाल यांचे वडील कर्नाटक शासनात सहसंचालक होते, तर आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते.
बंगळुरूच्या सेंट जोसेफ कॉलेजमधून इतिहास, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले.
दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मास्टर ऑफ ह्युमन रिसोर्स अँड ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी एमबीए केले.
आयपीएस होण्यापूर्वी त्यांना कॅम्पस रिक्रूटमेंटद्वारे नोकरीची ऑफर मिळाली होती. मात्र, त्यांनी ती स्वीकारली नाही.