सरकारनामा ब्यूरो
IPS ऐश्वर्या डोंगरे
2017 च्या बॅचच्या IPS ऐश्वर्या डोंगरे यांनी UPSC परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली.
केरळ केडरच्या असल्याने त्यांची त्रिवेंद्रम शहरात सहायक पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली, नंतर कोचीचे उपायुक्त म्हणून पदोन्नती झाली.
त्यांचा जन्म मुंबईत झाला आणि तिथल्याच सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांत त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली.
शाळेपासूनच त्यांनी नागरी सेवेत रुजू होण्याचे ध्येय बाळगले होते.
ठरवलेले ध्येय जपत महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी IPS होण्याचा प्रवास सुरू केला.
पदवीधर होताच यूपीएससीच्या तयारीसाठी आणि स्वतःला सज्ज करण्यासाठी त्या दिल्लीला रवाना झाल्या.
राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध विषयाची निवड करत त्याप्रमाणे तयारी करताना त्यांनी चालू घडामोडी, तसेच मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला.
अभ्यासातील सातत्य आणि कठोर मेहनतीने यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 196 व्या रँकसह यश मिळवले.
R