सरकारनामा ब्यूरो
विनायक हे मूळचे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याचे आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठातून पेट्रोकेमिकल अभियांत्रिकीमध्ये त्यांनी बी.टेक केले.
विनायक हे अमेरिकच्या एका तंत्रज्ञान कंपनी IBM मध्ये काम करत होते.
शिक्षण पूर्ण करताच त्यांनी तीन वर्षे नोकरी केली मात्र, यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी ती नोकरी सोडली.
यूपीएससीत अपयश आल्यास पुन्हा कॉर्पोरेट नोकरी करण्याची तयारीही त्यांनी केली होती.
यूपीएससी परीक्षेत वारंवार अपयश आल्यामुळे ते निराश झाले, परंतु कुटुंब आणि मित्रांनी पुन्हा परीक्षेत बसण्यास त्यांना प्रवृत्त केले.
2020 मध्ये पाचव्या प्रयत्नात विनायक 95व्या रँकसह आयएएस झाले.
IAS विनायक महामुनी हे सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.