सरकारनामा ब्यूरो
प्रेरणा सिंह या 2017 बॅचच्या IAS अधिकारी आहेत.
इंजिनिअरिंग क्षेत्राची पार्श्वभूमी असतानाही त्यांनी यूपीएससी सीएसई परीक्षेत अव्वल स्थान मिळवले.
नवी दिल्लीच्या प्रेरणा यांनी सांगितले, की यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी पूर्ण समर्पण आवश्यक आहे.
व्यक्तिमत्व चाचणीसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे DAF अर्ज. तो भरताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.
सुरुवातीपासून शेवटपर्यंत वर्तमानपत्र वाचणाची सवय असणे आणि मुख्य परीक्षा संपली तरी पेपरचा अभ्यास पुढे चालू ठेवला पाहिजे.
कोणतीही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी त्याबाबतचा संपूर्ण अभ्यास आणि पायाभूत माहिती असणे आवश्यक आहे.
UPSC च्या तयारीसाठी त्यांनी 6 वी ते 12 वी पर्यंतची NCERT च्या सर्व पुस्तकांचे वाचन करुन परीक्षेत यश मिळवले.
उत्तर प्रदेशातील इटावा येथे मुख्य विकास अधिकारी (CDO) पदावर त्या कार्यरत आहेत.