सरकारनामा ब्यूरो
IPS रोहन जगदीश यांनी 224 वी रँक मिळवत यूपीएससी परीक्षेत यश संपादन करत अनेक युवकांना प्रेरणा दिली आहे.
बंगळुरू विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमधून त्यांनी बीए एलएलबी आणि अर्थशास्त्र विषयात कायद्याची पदवी प्राप्त केली.
शिक्षण पूर्ण करताच यूपीएससीच्या प्रवासाला सुरूवात केली आणि ही परीक्षा पास होण्यासाठी त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला.
ICSE बोर्डातून शिक्षण झाल्याने त्यांना NCERT बद्दल काहीच माहिती नव्हते. तसेच मार्गदर्शनाचा अभाव हे त्यांचे सर्वात मोठे अडथळे ठरले.
या समस्यांमुळे पहिल्या तीन प्रयत्नात त्यांना अपयश पचवावे लागले. नंतर त्यांनी प्रिलिम्सची तयारी आणि ऐच्छिक विषयावर लक्ष केंद्रित केले.
कालांतराने उत्त्तम मार्गदर्शकाच्या मदतीने त्यांनी अभ्यासाचा आराखडा बनवला आणि परीक्षा दिल्या.
व्यक्तिमत्व चाचणीच्या वेळी योग्य दिशेने नेण्यात तसेच मार्गदर्शन करण्यात त्यांच्या मित्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कोणतेही कोचिंग तसेच कोणताही क्लास न लावता त्यांनी घरीच स्वत:च्या नोट्स तयार केल्या.
यूपीएससीच्यी चौथ्या प्रयत्नात त्यांनी 224 वी रँक मिळवली अन् तरुण वयातच यशाचे शिखर गाठले.