Rashmi Mane
तीन वेळा UPSC मध्ये नापास, तरी जिद्दीनं पूर्ण केलं 'आयएएस'चं स्वप्नं! आम्ही तुम्हाला सांगणार आहोत लखनऊचे DM सूर्य पाल गंगावार यांची सक्सेस स्टोरी.
उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील बिथरी गावात जन्मलेल्या गंगवारला लहान वयातच अनेक अडचणींमधून जावे लागले. पण हार न मानण्याच्या त्यांच्या स्वभावाने त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत नेले.
एका सामान्य कुटुंबातील सूर्य पाल गंगवार हे बरेली जिल्ह्यातील आहेत. त्यांचे वडील शिक्षक होते.
सूर्य पाल गंगवार यांनी इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंतचे शालेय शिक्षण नवाबगंज शहरातील एका शाळेत केले. सुर्यपाल गंगावार हे नेहमीच नवोदय विद्यालयाला भेट देत असत. तिथूनच त्यांना सूर्यपाल गंगवार यांना 'डीएम' बनण्याची प्रेरणा मिळाली.
सुर्य पाल यांनी बारावीनंतर इंजिनीअरिंगमध्ये करिअर करायचे ठरवले. त्यांनी आयआयटी रुरकीमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. सूर्य पाल गंगवार यांनी अनेक वर्षे EMC आणि Philips येथे काम केले.
त्यांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली, पण त्यांनी भारतात काम करणे पसंत केले. 2004 मध्ये पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली पण त्यांना यश मिळालं नाही.
2005 मध्ये पुन्हा तयारी सुरू केली आणि यावेळीही अपयशी ठरले. यानंतर त्यांनी नोकरीनंतरचा संपूर्ण वेळ यूपीएससीच्या तयारीसाठी दिला.
आयएएसची परीक्षा उत्तीर्ण होईल, असा त्यांना विश्वास होता. सूर्यपाल गंगवार 2006 मध्ये UPSC परीक्षेला बसले होते, पण त्याला मेनमध्ये यश मिळाले नाही.
त्यांनी पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि 476 व्या क्रमांकासह 'आयआरएस'मध्ये निवड झाली. त्यानंतर 2008 मध्ये तिसऱ्यांदा पुन्हा परीक्षा दिली आणि 8वी रँक मिळवून 'आयएएस' झाले.