Deepak Kulkarni
काँग्रेसच्या एका महिला उमेदवारानं प्रचाराला पैसे मिळत नाहीत म्हणून थेट निवडणुकीतूनच माघार घेतल्याचं समोर आलं आहे.
सुचरिता मोहंती असं या महिला उमेदवाराचं नाव आहे.
पुरी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा करत त्यांनी आपल्याला मिळालेलं पक्षाचं तिकीट पक्षाला परत केलं आहे
मतदारसंघात प्रचार करण्यासाठी लोकवर्गणीतून पैसे गोळा करण्याचाही प्रयत्न केला. पण फारसा प्रतिसाद मिळाला नाही, असंही त्यांनी सांगितलं.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजोय कुमार यांनी तर माझा खर्च मीच करावा, असं स्पष्टपणे सांगितल्याचा आरोपही मोहंती यांनी केला आहे.
व्यवसायानं पत्रकार असलेल्या सुचरिता मोहंती यांनी 2014 मध्ये देखील काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.
त्यावेळी बिजू जनता दलाच्या पिनाकी मिश्रा यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यावेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मोहंती यांना 2,89,800 इतकी मतं मिळाली होती.
ओडिशात 13, 20, 25 मे आणि 1 जून अशा चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होत आहेत, तर पुरी लोकसभा मतदारसंघासाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे.