Rashmi Mane
सुधाकर अचवल यांची इंग्लंडच्या विंचेस्टर शहराचे महापौर म्हणून निवड हा एक ऐतिहासिक क्षण!
पेठे विद्यालय व आर. वाय. के. कॉलेजमधून शिक्षण, त्यानंतर मुंबईत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
१९७३ मध्ये संशोधनासाठी इंग्लंड गाठले. विविध देशांमध्ये नोकरी केल्यानंतर अखेर अध्यापन क्षेत्रात स्थिरावले.
१९९७ पासून विंचेस्टर शहरात कामाला सुरुवात केली. सामाजिक व धार्मिक उपक्रमांत सक्रिय सहभाग!
१५ वर्षांपासून नगरसेवक (Councillor) म्हणून कार्यरत. प्रशासनात लोकहितासाठी सातत्याने काम.
१४ मे २०२५ रोजी विंचेस्टर शहराच्या महापौरपदी नियुक्ती. शहरातील सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून गौरव!
प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सामाजिक जागृती, निधी संकलन आणि ‘बॉलीवूड नाईट्स’सारख्या उपक्रमांची आखणी.
सुधाकर अचवल यांनी आपले मूळ न विसरता, जगाच्या पातळीवर नाशिकचं नाव उंचावलं!