Vijaykumar Dudhale
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार यांचा जन्म 30 जुलै 1962 रोजी चंद्रपूर येथे झाला. त्यांचे पदवीचे शिक्षण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून झाले.
वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी ते चंद्रपूर येथील सरदार पटेल विद्यालयात विद्यार्थी संघाचे सचिव बनले होते.
सुधीरभाऊंनी आमदार होण्यापूर्वी 1989 आणि 1991 मध्ये लोकसभेला नशीब आजमावून बघितले हेाते. मात्र, दोन्ही वेळा त्यांना त्यात अपयश आले.
मुनगंटीवार हे 1993 मध्ये भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बनले. त्यानंतर झालेल्या 1995 च्या विधानसभा निवडणुकीत ते तब्बल 55 हजार मतांनी निवडून आले होते.
शिवसेना-भाजपच्या युती सरकारमध्ये (1995) ते पर्यटन आणि ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री बनले. ते 1996 मध्ये भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि 2001 मध्ये भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले.
सुधीर मुनगंटीवार हे 2010 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले. त्यांनी विधानसभेच्या 1995 पासून 2019 पर्यंतच्या तब्बल सहा निवडणुका जिंकल्या आहेत.
मोदी लाटेत 2014 मध्ये राज्यात पुन्हा भाजपचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मुनगंटीवार यांच्याकडे राज्याची आर्थिक तिजोरी देण्यात आली होती. त्याशिवाय त्यांच्याकडे वन विभागाचाही पद्भार होता.
मुनगंटीवार हे विद्यमान सरकारमध्ये वन, सांस्कृतिक आणि मत्सपालन विभागाचे मंत्री आहेत. मागील सरकारच्या काळात त्यांनी 33 कोटी वृक्ष लागवड योजना घोषित केली होती. पुढे ती वाद्ग्रस्त ठरली आणि महाविकास आघाडी सरकारने तिची चौकशी लावली होती.
राजकारणात वापरल्या जाणाऱ्या 'हॉर्स ट्रेडिंग' शब्दाचा अर्थ नक्की काय असतो ?