साखरेचे वाढते दर अन् केंद्र सरकारचा मोठा निर्णय...

Deepak Kulkarni

साखरेचे दर

साखरेच्या दरात दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. सध्या दर 80 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याची माहिती आहे.

maharashtra sugar price | Sarkarnama

100 रुपयांपर्यंत दर

तसेच येत्या सणासुदीच्या काळात साखरेची मागणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे साखरेचे दर 100 रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यापारी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे. 

maharashtra sugar price | Sarkarnama

महिन्याला 3 लाख टन साखर

सरासरी महिन्याला 3 लाख टन साखरेचा वापर राज्यात होत असतो. आता महाराष्ट्राकडे सुमारे 17 ते 18 लाख टन साखर शिल्लक असल्याची माहिती साखर विभागाने दिली आहे.

maharashtra sugar price | Sarkarnama

सरकारचे कठोर नियम

साखरेचे वाढते दर लक्षात घेता केंद्र सरकारने 1 ऑगस्टपासून 30 नोव्हेंबरपर्यंत साठा मर्यादेचे निर्बंध लागू केले आहेत. 

Modi Government | Sarkarnama

अन्यथा कारवाई

अन्न व पुरवठा विभागाकडून साखर साठ्याबाबत आदेश जारी, 4000 क्विंटलपेक्षा अधिकच्या साखरेचा साठा न करण्याचे निर्देश दिले असून अन्यथा कारवाई केली जाणार आहे. 

maharashtra sugar price | Sarkarnama

10 लाख टन साखर आयात

सरकारकडून 31 ऑक्टोबरपर्यंत 10 लाख टन साखर आयात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचदरम्यान, व्यापारी, ग्राहक यांसह विविध उत्पादकांनाही साठा मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

maharashtra sugar price | Sarkarnama

कठोर कारवाई

याच पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे साखरेची साठेबाजी आणि काळाबाजार याविरोधात कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

Modi government sugar price | Sarkarnama

साठ्याची माहिती

अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या https://foodstock.dfpd.gov.in/ या पोर्टलवर सर्व विक्रेत्यांना साखरेच्या साठ्याची माहिती घोषित करून ती नियमितपणे अद्ययावत ठेवणे बंधनकारक असणार आहे.

sugar | sarkarnama

NEXT: गर्भवती महिलांना नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचा खास मेसेज, पहिल्या अपत्यासाठी 5 हजार मिळणार तर दुसऱ्या...

PM Matru Vandana Yojana | Sarkarnama
येथे क्लिक करा...