पतीने सोडली बड्या नेत्याची साथ, IAS पत्नीची स्वेच्छानिवृत्ती घेत राजकारणात उडी

Rajanand More

सुजाता राऊत

माजी आयएएस अधिकारी सुजाता राऊत कार्तिकेयन यांनी नुकताच बिजू जनता दलामध्ये प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री व पक्षाचे प्रमुख नवीन पटनायक यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

EX IAS Sujata Ruot | Sarkarnama

पांडियन यांच्या पत्नी

सुजाता या माजी सनदी अधिकारी व्ही. के. पांडियन यांच्या पत्नी आहेत. पांडियन हेही स्वेच्छानिवृत्तीनंतर बिजू जनता दलामध्ये सक्रीय होते. पटनायक यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते.

EX IAS Sujata Ruot | Sarkarnama

राजकारणातून संन्यास

पांडियन यांनी २०२४ मधील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्यानंतर थेट राजकारणातून संन्यास घेतला.

EX IAS Sujata Ruot | Sarkarnama

पत्नी राजकारणात

आता पत्नी सुजाता यांनी राजकारणात प्रवेश करत पतीच्या पावलावर पाऊल टाकले आहे. त्यांनी मार्च २०२५ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

EX IAS Sujata Ruot | Sarkarnama

वरिष्ठ अधिकारी

सुजाता या पटनायक सरकारमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून अनेक वर्षे सक्रीय होत्या. त्या ओडिशा केडरच्या २००० बॅचच्या आयएएस अधिकारी होत्या.

EX IAS Sujata Ruot | Sarkarnama

ममता योजना

राज्यातील ममता योजनेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. सामाजिक कल्याण संचालक म्हणून त्यांनी या योजनेची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी केली.

EX IAS Sujata Ruot | Sarkarnama

मिशन शक्ती

महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या मिशन शक्ती या महत्त्वाकांक्षी योजनेचे नेतृत्व करत त्यांनी सुमारे ७० लाख महिलांचे जाळे उभे केले होते.

EX IAS Sujata Ruot | Sarkarnama

भाजपची सत्ता

राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर त्यांनी वर्षभरातच स्वेच्छानिवृत्ती घेतली. तेव्हापासूनच त्या राजकारणात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानुसार त्यांनी नुकताच बीजेडीमध्ये प्रवेश केला.

EX IAS Sujata Ruot | Sarkarnama

NEXT : भाजप नेत्याचे 54 व्या वर्षी दुसरं लग्न; सांभाळलंय मुख्यमंत्रिपद...

येथे क्लिक करा.