Rajanand More
तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय आणि प्रसिध्द अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. दोघेही लवकरच विवाह करणार असल्याच्या चर्चाही सुरू आहेत.
विद्यमान मुख्यमंत्री विजय यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच देशातील एका माजी मुख्यमंत्र्यांनी अभिनेत्रीशी लग्नगाठ बांधली आहे.
त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव कुमार देव आणि प्रसिध्द कन्नड अभिनेत्री त्रिवेणी राव हे नुकतेच विवाहबध्द झाले. या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.
विप्लव देव हे सध्या भाजपचे खासदार आहेत. त्यांचे वय ५४ वर्षे इतके असून त्यांचे हे दुसरं लग्न आहे. मागीलवर्षीच त्यांनी २५ वर्षाच्या संसारानंर पहिल्या पत्नी नीति यांच्यासोबत घटस्फोट घेतला आहे.
देव हे त्रिपुराचे पहिले भाजपचे मुख्यमंत्री होते. त्यांनी २०१८ ते २०२२ या कालावधीत मुख्यमंत्रिपद सांभाळले. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले आणि लोकसभेत पोहोचले.
त्रिवेणी राव या प्रसिध्द कन्नड अभिनेत्री आहेत. २०१८ मधील तंगारू या चित्रपटाने त्यांना ओळख मिळवून दिली. त्यांची कॉन्स्टेबल सरोजा ही भूमिका लोकप्रिय ठरली होती.
विप्लव देव आणि त्रिवेणी यांची ओळख कधी, कुठे झाली, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
देव यांच्या विवाहाची सध्या चर्चा होत आहे. या लग्नासाठी केवळ मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते. आगरतळा येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागत समारंभ झाला.