Rashmi Mane
राज्याच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.
राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर हे उद्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागेवर सौनिक यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती सुत्रानं दिली..
सध्या राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यासोबतच महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची आणि इक्बाल सिंह चहल यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे.
तर प्रथमच महिला अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मात्र, यामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार, सुजाता सौनिक यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे.
सुजाता सौनिक 1987 पासून प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
सौनिक यांनी इतिहास विषयात मास्टर्स केले आहे.
सौनिक या कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या. तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृह मंत्रालय, सरकारच्या सल्लागार आणि सहसचिव म्हणून काम केले आहे.