सुखबीर सिंग संधू, विवेक जोशी कोण? निवडणूक आयोगाच्या कामकाजावर घेतला आक्षेप

Roshan More

सुखबीर सिंग संधू

सुखबीर सिंग संधू हे १९८८ च्या बॅचचे उत्तराखंड केडरचे निवृत्त आयएएस (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी १५ मार्च २०२४ रोजी भारताचे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.

Sukhbir Singh Sandhu, Vivek Joshi, Election Commissione | sarkarnama

शिक्षण

त्यांनी अमृतसरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली आहे. तसेच, त्यांनी इतिहासात पदव्युत्तर पदवी (MA) मिळवली असून ते लॉ ग्रॅज्युएट (कायदा पदवीधर) देखील आहेत.

Sukhbir Singh Sandhu | sarkarnama

उत्तराखंडचे मुख्य सचिव

ते जुलै २०२१ ते जानेवारी २०२४ या काळात उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव होते.

Sukhbir Singh Sandhu | sarkarnama

NHAI चे अध्यक्ष

त्यांनी 'नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया' (NHAI) चे अध्यक्ष म्हणून सुमारे २ वर्षे काम पाहिले. तसेच केंद्रीय उच्च शिक्षण विभागात अतिरिक्त सचिव म्हणून आयआयटी आणि आयआयएम सारख्या संस्थांचे कामकाज पाहिले.

Sukhbir Singh Sandhu | sarkarnama

लोकपाल सचिव

त्यांनी भारताच्या लोकपालचे सचिव म्हणूनही संक्षिप्त काळ सेवा दिली.तसचे उत्तराखंडमध्ये तीन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या ४ मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी सुमारे ८ वर्षे काम केले.

Sukhbir Singh Sandhu | sarkarnama

डॉ. विवेक जोशी

डॉ. विवेक जोशी हे १९८९ च्या बॅचचे हरियाणा केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी निवडणूक आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.

Sukhbir Singh Sandhu | sarkarnama

इंजिनिअर ते अधिकारी

त्यांनी आयआयटी (IIT) रुरकी येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंग (B.E.) पूर्ण केले. त्यानंतर, आयआयएफटी (IIFT) दिल्लीतून आंतरराष्ट्रीय व्यापारात पीजी डिप्लोमा केला. त्यांनी जिनेव्हा विद्यापीठातून (स्वित्झर्लंड) आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रात एम.ए. आणि पीएच.डी. पूर्ण केली आहे.

Sukhbir Singh Sandhu | sarkarnama

NEXT : आकडेवारी सांगून मोदी सरकारला अडचणीत आणणारे सुभाषचंद्र गर्ग कोण?

येथे क्लिक करा