Rashmi Mane
भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बीड जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पहिल्यांदाच झाले ध्वजारोहण.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला आणि बलिदानाला अभिवादन करण्यात आलं. उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य देत ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा संकल्प व्यक्त केला.
बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीरपणे काम करत असून, या विकासाच्या प्रवासात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असं आवाहन करण्यात आलं.
बीडमधील ९६ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ७११ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
पुढील टप्प्यात आणखी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्री स्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलं.
अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी १,४५९ कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. त्यापैकी ६३४ कोटी रुपये ९ लाख २२ हजार ३६२ शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे देण्यात आले आहेत.
बीडमध्ये 80वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. “तिरंगा सदैव उंच राहो, भारताचा गौरव सदैव वाढत राहो,” असा संदेश देत स्वातंत्र्यसैनिकांना मनःपूर्वक अभिवादन करण्यात आलं.