उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार लालबागच्या राजाच्या चरणी; होणाऱ्या सूनबाई आणि पार्थ पवारांची खास उपस्थिती!

Rashmi Mane

लालबागच्या राजाच्या चरणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गणरायाकडे प्रार्थना केली.

बळीराजासाठी घातले साकडं

दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान भरून निघावे आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी सुनेत्रा पवार यांनी साकडे घातले आहे.

शेतकऱ्यांच्या वेदनेचा उल्लेख

वर्षभर मेहनत करून उभी केलेली पिके संकटामुळे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. या परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

नुकसानभरपाईची आशा

शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी आणि त्यांच्या आयुष्यात पुन्हा आशेचे वातावरण निर्माण व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी केली.

होणाऱ्या सुनेचीही उपस्थिती

लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांच्या होणाऱ्या सुनेचीही उपस्थिती होती.

पार्थ पवारही सोबत

यावेळी पार्थ पवार देखील उपस्थित होते. पवार कुटुंबीयांनी एकत्रितपणे लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

बळीराजाच्या पाठीशी राहण्याचा निर्धार

शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी आवश्यक मदत मिळावी, यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

Next : युवकांसाठी बंपर संधी! CRPF मध्ये 521 जागांवर भरती जाहीर; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया एका क्लिकवर! 

येथे क्लिक करा