Jagdish Patil
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज (ता.10) मंत्रालयात पदभार स्वीकारला.
अजितदादांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी सुनेत्रा पवारांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.
त्यानंतर त्यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.
त्यानंतर त्या मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात दाखल झाल्या.
दालनात प्रवेश करताच सुनेत्रा पवारांनी अजितदादांच्या खुर्चीला हात जोडून नमस्कार केला.
यावेळी त्यांनी अजितदादांच्या प्रतिमेला वंदन केलं आणि त्यानंतर पदाचा कार्यभार स्वीकारला.
अजितदादांनी आयुष्यभर विकासाचा जो ध्यास घेतला, तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ असेल असं त्या यावेळी म्हणाल्या.
'दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही; पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन.'
दादांच्या स्मृतीपुढे महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेने आणि समर्पणाने कार्य करण्याचं मी वचन देते, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या.