Roshan More
अजित पवार हे बारामतीकरांचे प्रश्न आपल्या सहयोग सोसायटीमधील निवास्थानी जनता दरबार घेत सोडवायचे.
अजित पवारांकडे बारामतीकर अनेक समस्या घेऊन येत असत. अजितदादा प्रशासनाला सुचना करत हे प्रश्न सोडवायचे.
अजित पवारांचा हा वारसा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील जपला.
आज सकाळपासूनच सहयोग सोसायटीतील सुनेत्रा पवारांच्या निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सुनेत्रा पवारांनी आज बारामतीकरांच्या प्रश्न ऐकुण घेत समस्य सोडवल्या.
नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना देखील त्यांनी दिल्या.
लोकांशी थेट संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर तत्परतेने कार्य करण्याची परंपरा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जपली होती; त्याच परंपरेला पुढे नेण्यासाठी मी वचनबद्ध आहे, देखील त्यांनी सांगितले.