Chetan Zadpe
राष्ट्रवादी काँग्रसेमधील बंडानंतर बारामती मतदारसंघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
सुनेत्रा पावर यांचा परिचय फक्त माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी इतकीच नाही तर त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे केवळ बारामतीच नाही तर संपूर्ण राज्यात त्यांची वहिनी अशी ओळख आहे.
मराठवाड्याततील मोठ्या राजकीय घराण्यात 18 ऑक्टोंबर 1963 साली सुनेत्रा पवार यांचा जन्म झाला. त्यांचे मोठे बंधू डॉ. पद्मसिंह पाटील यांचे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन मिळाले.
1985 साली अजित पवारांशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर त्या बारामतीतील पवारांच्या काटेवाडीच्या वहिनी झाल्या.
मागील काही दिवसात सुनेत्रा पवार यांनी विवाह सोहळे, क्रिडा महोत्सव, गावच्या यात्रा, हळदीकुंकू समारंभ अशा अनेक कार्यक्रमांना बारामती तालुक्याच्या बरोबरीनेच पुरंदर, इंदापूर भागात उपस्थिती लावली.
बारामतीत सुनेत्रा पवारांचा जनसंपर्क सुरुवातीपासून राहिला आहे. कोरोनाकाळातही त्या जिल्ह्यात सक्रिय होत्या. यामुळे त्यांचा ग्रासरुटला कनेक्ट आहे.
बारामतीमधून अजित पवार आणि सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून येतात. यामध्ये प्रचार आणि मतांच्या जुळवाजुळव करण्यात सुनेत्रा पवार यांचा खारीचा वाटा राहिला आहे.