Ganesh Sonawane
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांच्या निवडीला थेट पक्षातून आव्हान देण्यात आलं आहे.
पक्षातील ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप नोंदवला आहे.
9 जुलैला सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी केली आहे.
सुनेत्रा पवार यांच्या निवडीला विरोध करणारे सच्चिदानंद सिंह पक्षाचे झारखंडचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
गेल्या १५ र्षांपासून सच्चिदानंद सिंह राष्ट्रवादीसोबत जोडलेले आहेत.
अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष असताना कर्जत येथे डिसेंबर 2023 मध्ये सिंह यांची राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती झाली होती.
26 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आलेल्या कार्यकारिणीत सिंह यांचा समावेश नाही.
पक्षातीलच नेत्याने सुनेत्रा पवारांना नोटीस पाठवल्याने एकच खळबळ उडाली असून या मागे दुसऱ्या कुणाचा तरी ब्रेन असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.