Deepak Kulkarni
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील यांच्या निवासस्थानी गुरुवारी(ता.27) सदिच्छा भेट दिली.
सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट शेअर या भेटीची माहिती दिली आहे. त्यांनी यावेळी विखे - पाटील कुटुंबीयांनी आपुलकीनं त्यांचं स्वागत केलं.
सुनेत्रा पवार या सहकार चळवळीचे जनक आणि सहकारी साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त प्रवरानगर येथील समारंभ आणि साहित्य व कलागौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित होत्या.
त्यांनी डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून प्रवरेची ओळख निर्माण केली. ही या कार्याची मोठी पावती आहे. प्रवरानगरच्या या सहकार पंढरीत शेती, सहकार, उद्योग, शिक्षण आणि संस्कृतीचा सुरेख संगम अनुभवता आल्याचंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.
या भेटीदरम्यान विखे कुटुंबाशी राजकीय तसेच विविध सामाजिक विषयांवर मनमोकळ्या गप्पा झाल्याचंही सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे. तसेच कुटुंबीयांनी केलेल्या आपुलकीच्या स्वागताने मनापासून आनंद झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांनी अभिवादन केलं. तसेच त्यांच्या कार्याचा आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा आढावा घेणाऱ्या फोटो गॅलरीला भेट देऊन त्यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
सुनेत्रा पवार म्हणतात, सहकार, कृषी आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी विखेंनी केलेले कार्य महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव प्रेरणादायी राहील.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२६व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं. यावेळी त्यांच्या कार्याचा आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचा आढावा घेणाऱ्या फोटो गॅलरीला भेट देऊन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सुनेत्रा पवारांचे चुलत सासरे आप्पासाहेब पवार यांनी पद्मश्रींच्या कारखान्यात व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे या जयंती सोहळ्याशी माझा एक भावनिक संबंधांचाही उल्लेख पोस्टमध्ये केला आहे.