Roshan More
ध्वजरोहण
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथील पक्ष कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडला.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, आजचा हा वर्धापन दिन अत्यंत वेगळा आणि भावनिक आहे, कारण आज आपल्या सर्वांमध्ये आपले आदरणीय दादा नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत हा दिवस साजरा करताना त्यांच्या आठवणी मनात दाटून येतात.
आदरणीय दादांनी पक्षासाठी जे कार्य केलं, जे योगदान दिलं आणि जी निष्ठा दाखवली, ते कधीही विसरता येणार नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या विचारधारेचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, ते खरंच प्रेरणादायी आहेत, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिन सोहळा मुंबईतील कार्यालयात पार पडला.
ज्येष्ठ नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वर्धापनानिमित्त अजितदादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील,वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,कृषी मंत्री दत्तात्रय भरणे,नवाब मलिक,खासदार राजेंद्र जैन,आमदार पंकज भुजबळ यांच्यासह राज्यभरातील पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.