वसंतदादा पाटील यांचे कार्यकर्ते ते पवार काका-पुतण्याचे विश्वासू : सुनील तटकरेंची राजकीय हिस्ट्री

Pradeep Pendhare

राष्ट्रवादीचं नेतृत्व

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार, यावरून राज्याच्या राजकारण ढवळून निघालं आहे.

Sunil Tatkare Political | Sarkarnama

तटकरे केंद्रस्थानी

अजित पवार यांच्या निधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरून, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

Sunil Tatkare Political | Sarkarnama

राजकीय वारसा

वडील दत्तात्रय तटकरे हे काँग्रेसचे नेते आणि सरपंच, जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामुळे त्यांना घरातूनच राजकीय वारसा लाभला. वडिलांच्या निधनानंतर वसंतदादांनी सुनील तटकरे यांना राजकीय बळ दिलं.

Sunil Tatkare Political | Sarkarnama

राजकारणात एन्ट्री

युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुनील तटकरे यांची 1984 मध्ये राजकारणात एन्ट्री झाली. वसंतदादानी 1985 मध्ये विधानसभेचे तिकीट दिले, पण ते पराभूत झाले. पुढे 1995 मध्ये ते आमदार झाले.

Sunil Tatkare Political | Sarkarnama

पवारांची साथ

शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी सुनील तटकरे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Sunil Tatkare Political | Sarkarnama

अजितदादांचे विश्वासू

सुनील तटकरे हे शरद पवार आणि अजित पवार यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक, अशी ओळख आहे.

Sunil Tatkare Political | Sarkarnama

राजकीय वजन

सुनील तटकरे यांचे राज्यातील राजकीय वजन 1999 नंतर वाढले आहे. पक्षफुटीनंतरही त्यांचे स्थान अबाधित राहिले.

Sunil Tatkare Political | Sarkarnama

प्रदेशाध्यक्ष

2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत फूट पडली अन् सुनील तटकरे यांनी, अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारलं. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.

Sunil Tatkare Political | Sarkarnama

घोटाळ्याचा आरोप

अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.

Sunil Tatkare Political | Sarkarnama

भाजपबरोबर मैत्री

मित्रपक्ष भाजपमधील नेते अमित शहा यांच्याबरोबर दिल्लीत वजन वाढवल्याची चर्चा आहे.

Sunil Tatkare Political | Sarkarnama

NEXT : कोण आहेत मुंबईचे उपमहापौर...

येथे क्लिक करा :