Jai Anant Dehadrai : महुआ मोईत्रांची खासदारकी घालवणाऱ्या 'या' वकिलांचे असे आहे 'पुणे कनेक्शन'

Rajanand More

पुण्यात पदवीचे शिक्षण

सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असलेले देहाद्राई यांनी पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेजमधून पदवी मिळवली आहे.

Jai Anant Dehadrai | Sarkarnama

टाटा मोटर्समध्ये काम

पुण्यात नोव्हेंबर 2010 ते फेब्रुवारी 2011 या कालावधीत रिसर्च इंटर्न म्हणून टाटा मोटर्समध्ये काम केले.

Jai Anant Dehadrai | Sarkarnama

परदेशात शिक्षण

पेनीस्लिव्हॅनिया विद्यापीठात विधी शाखेत पदव्युत्तर पदवी. ज्येष्ठ वकिलांसोबत अनुभव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली सुरू केली.

Jai Anant Dehadrai | Sarkarnama

महुआ मोईत्रांशी घनिष्ठ मैत्री

जय अनंत देहाद्राई हे माजी खासदार महुआ मोईत्रा यांचे एक्स बॉयफ्रेंड. हे दोघे जवळपास तीन वर्ष एकत्र राहत होते.

Mahua Moitra | Sarkarnama

'हेन्री'मुळे झाला वाद

महुआ आणि जय यांचा हेन्री हा कुत्रा होता. दोघे वेगळे झाल्यानंतर हेन्रीच्या ताब्यासाठी जय यांच्याकडून उच्च न्यायालयात केस दाखल.

Jai Anant Dehadrai | Sarkarnama

महुआ यांची सीबीआयकडे तक्रार

कॅश फॉर क्वेरी प्रकरण बाहेर काढत महुआ यांची सीबीआयकडे तक्रार. भाजप खासदार निशीकांत दुबे यांनाही दिली माहिती.

महुआंची खासदारकी गेली

दुबेंनी जय यांच्याकडील माहितीनुसार संसदेत आवाज उठवला. चौकशीनंतर महुआची खासदारकी रद्द करण्यात आली.

सीबीआय चौकशी सुरू

महुआ यांची खासदारकी गेली असली तरी सीबीआय चौकशी अजून सुरू. जय यांचीही चौकशी केली जाणार.

Jai Anant Dehadrai | Sarkarnama

जय यांचा जबाब महत्वाचा

जय यांच्या जबाबानंतर महुआ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. त्यामुळे त्यांचा जबाब महत्वाचा मानला जात आहे.

Jai Anant Dehadrai | Sarkarnama

NEXT : उद्धव ठाकरे नाशिकला; तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या चरणी...

येथे क्लिक करा