Rajanand More
सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी एससी व एसटी आरक्षणांतर्गत उपवर्गीकरणास असहमती दर्शवली आहे.
सुप्रीम कोर्टातील सात न्यायाधीशांच्या खंडपीठातील सातपैकी एक न्यायाधीश होत्या बेला त्रिवेदी. त्यामुळे त्या सध्या चर्चेत आहेत.
बेला त्रिवेदी यांची 2021 मध्ये सुप्रीम कोर्टात नियुक्ती करण्यात आली आहे. गुजरात हायकोर्टात प्रमोशन मिळालेल्या पहिल्या महिला न्यायाधीश.
गुजरातमधील असून त्यांचा जन्म 10 जून 1960 मध्ये पाटन येथे झाला होता. वडीलही न्यायालयीन सेवेत कार्यरत असल्याने त्यांची ठिकठिकणी बदली होत होती.
शालेय शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले असून वडोदरा येथील एमएस विद्यापीठातून बीकॉम, एलएलबी पदवी मिळवली आहे.
न्यायाधीश म्हणून बेला त्रिवेदी यांची 10 जुलै 1995 रोजी अहमदाबादमधील सेशन कोर्टात नियुक्ती झाली.
वडील आणि मुलगी एकाच कोर्टात न्यायाधीश असल्याने त्यांची नोंद 1996 मध्ये लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये करण्यात आली.
सेशन कोर्टातील नियुक्तीनंतर 16 वर्षांनी म्हणजे 2011 मध्ये बेला त्रिवेदी यांची गुजरात हायकोर्टात नियुक्ती करण्यात आली.
पुढीलवर्षी 9 जून रोजी न्यायाधीशे बेला त्रिवेदी सेवानिवृत्त होत आहेत. सुप्रीम कोर्टातील अनेक महत्वाच्या निकालांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.