सरकारनामा ब्युरो विदर्भ
धनुष्यबाणाचं चिन्ह शिवसेना हा पक्ष गेली 33 वर्षे वापरत होता. पण चिन्हच गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतल्यानं उद्धव ठाकरे गटासाठी सर्वात मोठा धक्का बसला.
1968 साली शिवसेनेनं मुंबई महापालिकेचीही निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेनेचं चिन्ह होतं ढाल-तलवार होतं.
1980 च्या दशकात शिवसेनेला रेल्वे इंजिन चिन्ह मिळालं होतं. त्यावेळी मनोहर जोशी, सुभाष देसाई यांच्यासारख्या नेत्यांनी रेल्वे इंजिन चिन्हावर निवडणूक लढवली होती.
1985 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हं मिळाली होती. छगन भुजबळ यांनी त्यावेळी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली होती.
शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्ह 1989 साली मिळालं. 1989 साली निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना चिन्हासाठी नोंदणी करण्याची सूचना केली होती.
1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरता आलं. गेल्या 50 ते 60 वर्षांच्या राजकीय इतिहासात चिन्हावरुन वाद झाल्याचं हे काही पहिलंच प्रकरण नाही.
1989 ते 2022 पर्यंत धनुष्यबाण हीच शिवसेनेची ओळख होती. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ती ओळख तात्पुरती का होईना पुसली गेली आहे.
शिवसेना फुटीनंतर निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांना मशाल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्हं दिलं. सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अजून चालू आहे.
शिवसेनेच्या अनेक शाखांवर धनुष्यबाण चिन्हं अजून दिसते, ते हटवा आणि तिथं मशाल चिन्हं वापरा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी पुण्यातील मेळाव्यात केला.