Pradeep Pendhare
अॅड. असीम सरोदे यांची वकिलीची सनद तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने दिला. यामुळे नियम, कारणं, कारवाई चर्चेत आली आहे.
एखाद्या वकिलाची सनद म्हणजेच, परवाना रद्द होणे ही अतिशय गंभीर प्रक्रिया असून ती केवळ ठराविक कायदेशीर कारणांवर आणि तपासणीच्या प्रक्रियेनंतर होते.
वकिलांच्या सनदी संदर्भात अधिवक्ता कायदा, 1961मधील तरतुदी लागू होतात. विशेषतः कलम 35 ते 38 या विभागांत स्पष्ट नियम दिलेले आहेत.
वकिलाने व्यावसायिक नैतिकतेचे उल्लंघन केले, विसंगत वर्तन, फसवणूक केली, बनावट कागदपत्रे दिली, न्यायालयाचा अपमान केला किंवा गुन्हेगारी कृत्यानंतर सदन रद्द होते.
वकिलाविरुद्ध राज्य वकील परिषद चौकशी करू शकते. चौकशीदरम्यान वकील दोषी आढळल्यास त्याची सनद काही काळासाठी निलंबित करू शकते.Asim Sarode license
असीम सरोदे यांनी, “राज्यपाल फालतू आहेत” व “न्यायालय सरकारच्या दबावाखाली आहे”, असे विधान केल्याने तक्रार झाली होती.
अशा विधानांमुळे न्यायालयाबद्दल अविश्वास निर्माण होतो. न्यायव्यवस्था आणि संविधानिक पदांचा आदर राखणे, न्यायसंस्थेविषयी संयम आणि सन्मान राखला पाहिजे, असे निरीक्षण बार काउन्सिलच्या समितीने नोंदवले.
यातून पुढे राज्य वकील परिषद चौकशीत असीम सरोदे दोषी आढळल्याने त्यांची सनद रद्दची कारवाई झाली.