Rashmi Mane
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या नव्या पारंपरिक लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.
‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतून तेजस्विनीने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले. तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने ती आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे.
अलिकडेच झालेल्या साखरपुड्यावेळी तेजस्विनीने पारंपरिक मराठमोळा पेहराव केला होता. या लूकमध्ये पिवळ्या रंगाची हिरव्या काठापदराची साडीने ती खुलून दिसली.
नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, केसांचा सुंदर बन आणि मॅचिंग ज्वेलरी तेजस्विनीचा हा मराठमोळा लूक सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
तेजस्विनीचे साखरपुड्याचे फोटो इंटरनेटवर झपाट्याने व्हायरल झाले आहेत.
"मराठमोळं सौंदर्य!", "नथीतला नखरा भारीच!" अशा कमेंट्सने सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
तेजस्विनीचा साखरपुडा शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी थाटामाटात पार पडला. लवकरच ती सरवणकरांची सून होणार आहे.
तेजस्विनी आणि समाधान यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोमात आहे. चाहते त्यांच्या लग्न सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.