Article 370 Verdict : कलम 370 हटवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?

Sachin Fulpagare

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्य असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणी 20 हून अधिक याचिका केल्या होत्या.

Article 370 | Sarkarnama

सरन्यायाधीशांनी जाहीर केला निकाल

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यानंतर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी निकाल जाहीर केला.

Cji Chandrachud | Sarkarnama

5 सप्टेंबरला झाली होती अंतिम सुनावणी

न्यायाधीश संजय किशन कौल, संजीव खन्ना, बी. आर. गवई आणि सूर्यकांत यांचा घटनापीठामध्ये समावेश होता. या प्रकरणाची 5 सप्टेंबरला अंतिम सुनावणी घेत निकाल राखून ठेवण्यात आला होता. केंद्राने ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द केले होते.

Supreme Court | Sarkarnama

घटनापीठाचे तीन वेगवेगळे निर्णय

या प्रकरणी पाच न्यायाधीश असलेल्या घटनापीठाने तीन निर्णय दिले. एक निर्णय सरन्यायाधीशांचा, दुसरा निर्णय न्या. गवई आणि न्या. सूर्यकांत यांचा आणि तिसरा न्या. किशन कौल आणि न्या. संजीव खन्ना याचा होता.

Supreme Court | Sarkarnama

निर्णय वेगवेगळे पण निष्कर्ष एकच

घटनापीठातील तीन निर्णय वेगवेगळ असले तरी सर्वांचा निष्कर्ष हा एक होता. संसद किंवा राष्ट्रपातींच्या भूमिकेनुसार सरकार राज्यात आपल्या अधिकारांचा उपयोग करून शकते, असे म्हणत न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा दावा फेटाळून लावला.

Article 370 | Sarkarnama

"राज्याचा दर्जा परत द्या"

30 सप्टेंबर 2024 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक घ्या. यासोबतच राज्याचा दर्जा परत द्या, असे निर्देश न्यायालयाने दिले.

Article 370 | Sarkarnama

सरन्यायाधीश म्हणाले...

कलम 370 हटवण्याकरिता घटनात्मक आदेश जारी करण्यासाठी राष्ट्रपतींच्या शक्तीचा उपयोग करणे वैध आहे. यामुळे तत्कालीन राज्य जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळे करून केंद्र शासित प्रदेश करण्याचा केंद्र सरकार निर्णय वैध असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले.

Cji Chandrachud | Sarkarnama

न्यायमूर्ती संजय किशन कौल म्हणाले...

न्यायमूर्ती कौल यांनी सरन्यायाधीशांच्या मताशी सहमती दर्शवली. कलम 370 चा उद्देश हा जम्मू-काश्मीरला हळूहळू इतर राज्यांसोबत आणण्याचा होता. सरकार आणि सरकारच्या इतर यंत्रणांनी मानवाधिकार उल्लंघन प्रकरणी तपासासाठी आयोग बनवावा, असे निर्देश न्या. कौल यांनी दिले.

Supreme Court

NEXT : UPSC Success Story: 35 परीक्षांमध्ये अपयश, मात्र जिद्द सोडली नाही; वाचा IAS विजय वर्धन यांची सक्सेस स्टोरी !

येथे क्लिक करा...