Sunil Balasaheb Dhumal
बारामतीत शरयू फाउंडेशन व बारामती रनर्स यांच्या वतीने रविवारी बारामती हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली.
ऑलिंपिक विजेत्या मुष्टियुद्धपटू मेरी कोम यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनचा प्रारंभ झाला.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही फनरनमध्ये सहभागी होत मॅरेथॉनचा आनंद लुटला.
खासदार सुळे या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातील कर्तव्य पार पाडल्यानंतर या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाल्या होत्या.
शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार, उद्योजक श्रीनिवास पवार यांच्यासह शहरातील पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेत सहा हजारहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
काही महिलांनी थेट नऊवारी घालून स्पर्धेत भाग घेतला.