Sunil Balasaheb Dhumal
लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजले आहे. या निवडणुकीत राज्याचं लक्ष बारामती लोकसभा मतदारसंघावर आहे.
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि खासदार सुप्रीया सुळे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी चिन्ह दिले असून ते पक्षाच्या वतीने मतदारांपर्यंत पोहोचवले जात आहे.
सुप्रिया सुळेंनी प्रचार सुरू केला आहे. त्यांनी रेल्वेतून प्रवास करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
सुळेंनी बारामती लोकसभा मतदारसंघातील मोठे असलेल्या दौंड रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रवाशांशी संवाद साधला.
रेल्वे स्टेशनवर अनेक लोकांनी खासदार सुळे यांच्याशी गप्पा मारल्या.
लहानांसह थोरांनीही खासदार सुळे यांच्याबरोबरचे क्षण मोबाईलमध्ये कैद केले.
खासदार सुळेंनी अनोख्या पद्धतीने रेल्वेतून प्रवास करत लोकसभेचा प्रचार केला.