Chetan Zadpe
गुजरातच्या सुरत शहरात आज डायमंड बाजाराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
‘कस्टम क्लिअरन्स हाऊस’, ज्वेलरी मॉल आणि इंटरनॅशनल बँकिंग आणि सेफ व्हॉल्ट्सची सुविधा हे या बाजारातील महत्त्वाचे भाग असतील.
हिरे आणि त्यापासून बनवलेल्या दागिन्यांच्या व्यापारासाठी हे जगातील सर्वात मोठे आणि आधुनिक केंद्र असेल.
खडबडीत-ओबडधोबड आणि पॉलिश्ड हिरे, तसेच दागिन्यांच्या व्यापारासाठी हे जागतिक केंद्र असेल.
डायमंड बोर्समध्ये आयात आणि निर्यातीसाठी अत्याधुनिक कस्टम क्लिअरन्स हाऊस, रिटेल ज्वेलरी व्यवसायासाठी ज्वेलरी मॉल, आंतरराष्ट्रीय बँकिंग आणि सुरक्षित तिजोरी सुविधा आहेत.
डायमंड बोर्समध्ये अत्याधिनुक सोयीसुविधा आणि हिरे व्यापाऱ्याचे अत्याधुनिक जगातील असे हे प्रशस्त संकुल असणार आहे.
जगातल्या सर्वात मोठ्या हिरे व्यापाऱ्याच्या संकुलाला जोडणाऱ्या विमानतळाच्या टर्मिनलचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल.
हिऱ्यांविषयी आकर्षण असणाऱ्या जगभरातील लोकांसाठी हे व्यापारी केंद्र एक जागतिक केंद्र आहे. यामुळे गुजरातच्या आर्थिक उलाढालीला चालना मिळणार आहे.