सरकारनामा ब्युरो
माजी खासदार सुरेश कलमाडी यांना जवळपास 15 वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळ्याच्या आरोपांमधून क्लिनचीट मिळाली आहे.
या क्लिनचीटमुळे आज पुन्हा एकदा पुणेकरांना सुरेश कलमाडी यांचे नाव ऐकायला मिळाले.
पण एक काळ होता जेव्हा कलमाडी म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे कलमाडी हे समीकरण होते.
एरंडवणे भागातील कलमाडी हाऊस पुणे शहराच्या सत्तेचे केंद्र होते. कलमाडी आपल्या केबिनमधील झुलत्या खुर्चीतून सूत्र हलवायचे. तिथूनच पदांचे वाटप व्हायचे.
निवडणुकांच्या काळात 'सबसे बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी' ही घोषणा पुण्यातल्या प्रत्येक रस्त्यावर घुमायची.
पुणे महापालिका अनेक वर्षे सुरेश कलमाडी गटाच्या ताब्यात होती. पुण्याला पहिल्या महिला महापौरही कलमाडी यांच्यामुळेच मिळाल्या होत्या.
भारतीय हवाई दलातून कलमाडी यांनी राजकारणात प्रवेश करत आपला दबदबा तयार केला होता. सलग 30 वर्षे ते राज्यसभा आणि लोकसभेचे खासदार होते.
भारताचे तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री म्हणून कार्यरत होते.
पण 2010 पासून सुरेश कलमाडी यांच्या राजकारणाला उतरती कळा सुरू झाली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा प्रकरणात त्यांच्यावर 1700 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
या प्रकरणात सुरेश कलमाडी यांना 9 महिने तुरुंगवास देखील भोगावा लागला होता. अखेरीस आता त्यांना सीबीआय आणि ईडीकडून क्लिनचीट मिळाली आहे.
पाकला धडकी, भारतीय लष्कराचा कसून युध्दाभ्यास; पहलगाम हल्ल्यानंतर सैन्य सज्ज