माजी मंत्री तथा आमदार सुरेशदादा जैन यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं..सुरेशदादा जैन यांनी 8 मे 2024 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा दिला होता. .आपण राजकीय संन्यास घेतला असून कोणत्याही पक्षात सहभागी होणार नाही, असं जैन यांनी जाहीर केलं आहे..पण याचवेळी त्यांनी चांगलं काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या पाठीशी आपण राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.त्यांनी जळगावात भाजपला आपला जाहीर पाठिंबा देत असल्याची घोषणा केली आहे..1980 पासून सक्रीय राजकारणात प्रवेश केल्यानंतर जवळपास 34 वर्ष आमदार राहिले आहेत. .शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम त्यांना मंत्रिपद दिलं होतं.आपल्यावर भाजपचा कोणताही दबाव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. .2014 सालापासून ते तब्येतीच्या कारणांमुळे राजकारणापासून दूर राहिले होते..Next : हर्षवर्धन जाधवांना राजू शेट्टींच्या संघटनेचे बळ!.येथे पाहा