Deepak Kulkarni
पहलगाममध्ये मंगळवारी (ता.23) भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात निरपराध पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात 27 जणांचा मृत्यू झाला आहे.तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरुन चर्चा केली होती. तसेच त्यांना तत्काळ श्रीनगरला रवाना होण्यास सांगितले होते.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून जशास तसं प्रत्युत्तर देण्याची मागणी सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मेोदींनी या हल्ल्यानंतर कोणालाही सोडणार नाही असं स्पष्ट केलं होतं.तसेच त्यांनी सौदी अरेबियाचा दौराही आटोपता
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्यातील दोषींना सोडणार नसल्याचा इशारा दिला होता. तसेच त्यांनी सौदी अरेबियाचा दौरा आटोपता घेत पहाटेच दिल्ली गाठली होती. यावेळी त्यांची अजित डोवाल यांनी भेट घेतली.
भारतीय जेम्स बाँड म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भेट घेतलेली ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता.23) सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठक बोलावली होती. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि इतर उच्च अधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अत्यंत विश्वासू समजले जाणारे अजित डोवाल हेच उरी सर्जिकल स्ट्राईकचे मास्टर माईंड होते. आता पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची चर्चा जोर धरू लागली आहे.
अजित डोवाल यांनी दिल्ली विमानतळावर घेतलेली पंतप्रधान मोदींची भेट ,सुरक्षा समितीची बैठकीतील डोवालांची उपस्थिती आगे बडा कुछ होनेवालाचे संकेत आहेत.