सरकारनामा ब्यूरो
गांधीवादी विचार असणाऱ्या महिला आरोग्य मंत्री डॉ. सुशीला नायर कोण होत्या ? जाणून घ्या त्यांच्याविषयी...
नायर यांचा जन्म पाकिस्तानमध्ये असणाऱ्या कुंजाह या गावी 26 डिसेंबर 1914 साली झाला.
त्यांनी दिल्लीतील लेडी हार्डिंग मेडीकल कॉलेज मधून एमबीबीएस आणि एमडीची पदवी घेतली.
1939 मध्ये त्या गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमात आल्या आणि आरोग्य सेवेला सुरूवात केली.
1952 ते 1956 या कालावधीमध्ये त्या दिल्ली विधानसभेच्या सदस्या होत्या.
लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 1957, 1962, 1967 या वर्षात त्या झाशीमधून म्हणून निवडून आल्या होत्या. 1962 ते 1967 या कालावधीमध्ये त्यांनी आरोग्यमंत्री पद सांभाळले होते.
आरोग्य मंत्री असताना त्यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले.
त्यांनी 1969 मध्ये 'गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था' स्थापन केली.
त्यांनी आयुष्यभर ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्यात सुधारणा करण्यासाठी काम केले.