Rajanand More
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनी आपल्यातील नातं अधिकृतपणे मान्य केलं आहे. त्यामुळे तो सतत चर्चेत असतो.
शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. शिंदेंच्या ज्येष्ठ कन्या स्मृती पहाडिया यांचे शिखर हे चिरंजीव आहेत.
शिखरने दिवाळीनिमित्त इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. या फोटोमध्ये जान्हवीही होती. या पोस्टवर का तरुणीने पण ‘तू तर दलित आहेस’, अशी कमेंट केली होती.
शिखरने ती पोस्ट आणि त्यावरील कमेंट इन्स्टग्राम स्टोरीवर पोस्ट चांगलेच सुनावले आहे. त्याचे हे सणसणीत उत्तरही व्हायरल होत आहे.
तुमच्यासारख्या संकुचित व मागास विचारांचे लोक 2025 मध्येही आहेत, हे दुर्दैवी आहे. दिवाळी हा प्रकाश, एकतेचा सण. पण हे तुमच्या बुध्दीपलीकडचे आहे, असे शिखरने सुनावले आहे.
शिखरने म्हटले आहे की, विविधतेत भारताची शक्ती आहे. हेही तुम्हाला समजणार नाही. कारण सध्या तरी तुमच्या विचारांची पातळी ही एकमेव गोष्ट अस्पृश्य आहे.
शिखरचे वडील संजय पहाडिया हे उद्योजक असून त्याने 13 वर्षांचा असतानाच व्यवसाय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले होते. आई स्मृती या प्रोड्यूसर आहेत.
शिखरची एक कन्सल्टन्सी फर्म असून पाळीव श्वानांच्या मालकांना सल्ला देण्याचे काम ही फर्म करते.
प्रोफेशनल पोलो खेळाडू म्हणून शिखर याने आपली ओळख निर्माण केली होती. तसेच तो प्रशिक्षित घोडस्वारही आहे.