Vijaykumar Dudhale
शिखर पहारिया हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या स्मृती पहारिया यांचे चिरंजीव आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात शिखर पहारिया यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी गणेश मंडळांना भेटी दिल्या होत्या.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघासाठी शिखर पहारिया यांच्या नावाची चर्चा गणेशोत्सवात रंगली होती.
शिखर पहारिया यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने शहर मध्य मतदारसंघातून शिंदे कुटुंबातील सदस्याने निवडणूक लढवावी, अशी मागणी सोलापूर शहर युवक काँग्रेसकडून करण्यात आली होती.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी शिखर पहारिया यांच्या उमेदवारीची चर्चा रंगताच शिंदे कुटुंबीयाने तातडीने खुलासा केला होता. शहर मध्य मतदारसंघातून काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणूक लढवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवानंतर अवघ्या पंधरा ते वीस दिवसांतच शिखर पहारिया यांनी पुन्हा सोलापूरचा दौरा केला आहे.
शिखर पहारिया यांनी सोलापूर शहरातील बुद्ध विहार, शाहजहुर दर्गा, तसेच विविध शारदीय नवरात्रोत्सव मंडळांना भेटी दिल्या आहेत.
उद्योजक शिखर पहारिया यांनी विविध संस्था, औद्योगिक केंद्र, सामाजिक संस्थांना भेटी देऊन तेथील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच, काही ठिकाणी मदतही केली. त्यामुळे त्यांच्या नावाची पुन्हा दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.