सत्ता कुणाचीही असो, 'या' महिला नेत्याची खासदारकी फिक्स; भाजपलाही भूरळ...

Rajanand More

सुष्मिता देव

सुष्मिता देव यांना भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमधून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. राज्यातील पक्षाचे संख्याबळ पाहता त्या सहजपणे निवडून येतील अन् खासदारकीची टर्म पूर्ण करतील.

Sushmita Dev | Sarkarnama

असा आहे इतिहास

सुष्मिता देव यांनी काँग्रेस पक्षातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. या पक्षात त्यांनी राष्ट्रीय प्रवक्त्या तसेच अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणूनही जबाबदारी सांभाळली.

Sushmita Dev | Sarkarnama

पहिल्यांदा खासदार

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देव यांनी आसाममधील सिलचर मतदारसंघातून भाजप उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

Sushmita Dev | Sarkarnama

तृणमूलमध्ये प्रवेश

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देव यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये काँग्रेसचा राजीनामा देत पश्चिम बंगालच्या तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये प्रवेश केला.

Sushmita Dev | Sarkarnama

राज्यसभेच्या सदस्य

तृणमूल काँग्रेसने देव यांना राज्यसभेवर पाठवले. त्यांच्यावर आसाम व त्रिपुरासह ईशान्य भारतात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

Sushmita Dev | Sarkarnama

तृणमूलचा पराभव

काही महिन्यांपूर्वीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचा पराभव झाला अन् सत्ता हातातून गेली. त्यानंतर देव यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना लगेच राज्यसभेची उमेदवारीही जाहीर झाली.

Sushmita Dev | Sarkarnama

राजकीय वारसा

सुष्मिता देव या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोष मोहन देव यांच्या कन्या आहेत. त्यांना घरातून राजकीय वारसा असल्याने काँग्रेसमध्ये त्यांना नेहमीच मानाचे स्थान मिळत होते.

Sushmita Dev | Sarkarnama

सत्तेसोबत

देव यांचा सत्तेसोबत राहण्याचा इतिहास आहे. लोकसभेत पराभवानंतर तृणमूलमध्ये प्रवेश केला. तृणमूलची सत्ता गेल्यानंतर आता भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिकडे सत्ता तिकडे सुष्मिता देव, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Sushmita Dev | Sarkarnama

NEXT : राज्यपाल पदक पटकाविणाऱ्या IPS अधिकाऱ्याने दिला राजीनामा; केवळ 37 वर्षे वयाचे हे अधिकारी कोण?

येथे क्लिक करा.