Mayur Ratnaparkhe
शाश्वत विमान इंधन (SAF) हे एक कृत्रिम इंधन आहे.
शाश्वत मानले जाण्यासाठी, ते अक्षय स्रोतांपासून किंवा वापरलेले स्वयंपाकाचे तेल, चरबी, वनस्पती तेल, कृषी आणि वनांमधील कचरा यासारख्या कच्च्या मालापासून बनवलेले असते.
शाश्वत विमान इंधन (SAF) हे एक अक्षय जेट इंधन आहे जे सरासरी 80टक्के कार्बन उत्सर्जन कमी करू शकते.
तसेच जीवाश्म इंधनासोबत मिसळण्याची गरज न पडता विमानांना 100टक्के उर्जा देण्यासाठी विकसित केले जात आहे.
आंतरराष्ट्रीयस्तरावरील संस्था असलेल्या एएसटीएम इंटरनॅशनलने एसएएफच्या उत्पादनासाठी आठ तांत्रिक मार्गांना मान्यता दिली आहे.
HEFA (हायड्रोट्रेटेड एस्टर आणि फॅटी अॅसिड्स) -
- HEFA प्रक्रियेमध्ये हायड्रोट्रीटिंग आणि हायड्रोप्रोसेसिंगद्वारे वनस्पती तेल, टाकाऊ तेल किंवा चरबी SAF मध्ये शुद्ध केले जाते
अल्कोहोल-टू-जेटमध्ये ऑक्सिजन काढून टाकून आणि मॉल्युक्यूल एकत्र जोडून इथेनॉल आणि आयसो-ब्युटानॉल सारख्या अल्कोहोलचे SAF मध्ये रूपांतर करते.
हायड्रोजन वापरून, कार्बन डायऑक्साइड कॅप्चर करून आणि कृत्रिम इंधन तयार करण्यासाठी अक्षय वीज वापरून SAF तयार करता येते. या प्रकारच्या SAF ला कधीकधी eFuel किंवा Power-to-Liquid (PtL) असे संबोधले जाते.
आज SAF पारंपारिक जेट इंधनाच्या तुलनेत त्याच्या संपूर्ण लाईफसायकलमध्ये ८०टक्क्यांपर्यंत उत्सर्जन कमी करू शकते.
विमानतळांच्या पायाभूत सुविधांमध्ये बदल न करता, आज विमानतळांवर SAF चा वापर करता येतो.