Chetan Zadpe
अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, तुम्ही उत्साहाने स्वागत केले, त्यामुळे माझे हृदय भरून आले आहे. जगातील सर्वात प्राचीन संत परंपरा आणि सर्व धर्माची जननी असलेल्या संस्कृतीकडून तुमचे आभार मानतो.
मी आज या मंचावरील काही वक्त्यांचे आभार मानू इच्छितो. ज्यांनी हे सप्रमाण सांगितले की, सहिष्णुतेची कल्पना पूर्वेकडील देशांमधूनच संपूर्ण जगामध्ये प्रसारीत झाली आहे.
मला अभिमान आहे की, मी अशा धर्मातून येतो, ज्या धर्माने विश्वाला सहिष्णू-सार्वभौम विचारांच्या स्वीकाराचा वस्तुपाठ दिला आहे. केवळ सहिष्णुताच नाही तर नाही, तर आम्ही सर्व धर्मांना सत्य मानतो.
मला अभिमान आहे की माझ्या देशाने जगातील सर्व धर्मात छळल्या गेलेल्या लोकांना आश्रय दिला. आम्ही आमच्या हृदयात इस्रायलच्या पवित्र स्मृती जपल्या आहेत, रोमन आक्रमणकर्त्यांनी त्यांची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली आणि नंतर त्यांनी दक्षिण भारतात आश्रय घेतला.
माझ्या देशाने पारशी धर्माच्या लोकांना आश्रय दिला आहे आणि अजूनही त्यांना सतत मदत करत आहे.
ज्याप्रमाणे नद्या वेगवेगळ्या ठिकाणी उगम पावतात, वेगवेगळे मार्ग पत्करून शेवटी समुद्राला मिळतात. त्याचप्रमाणे माणूस आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे मार्ग निवडतो. प्रत्येकाचे मार्ग भिन्न असू शकतात, परंतु ते सर्व एकाच देवाकडे घेऊन जातात.
अमेरिकेतली ही परिषद ही गीतेच्या शिकवणीचा साक्षात पुरावा आहे. जो कोणी माझ्याकडे येतो, तो कसाही आला तरी मी त्याच्यापर्यंत पोहोचतो. लोक वेगवेगळे मार्ग निवडतात, समस्यांना तोंड देतात, पण शेवटी माझ्यापर्यंत पोहोचतात.
प्रादेशिकता - कट्टरता आणि धर्मांधतेने या सुंदर भूमीला फार पूर्वीपासून उपद्रव झाला आहे. या भूमीला हिंसाचाराने भळभळत ठेवली. अनेकदा ही पृथ्वी रक्ताने माखून गेली. कितीतरी संस्कृतीचा ऱ्हास झाला. अनेक देश-प्रदेश नष्ट झाले.
अशा प्रकारचे भयंकर राक्षस अस्तित्वात नसते तर मानवी समाज आजच्यापेक्षा खूप चांगला झाला असता. पण या दृष्ट प्रवृत्तींची वेळ आता संपली आहे. या संमेलनाच्या बिगुलाने या दृष्ट प्रवृतींचा नाश होईल.