Pradeep Pendhare
अमेरिकेतील सिएटल शहराच्या मध्यवर्ती भागात स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती कांस्य पुतळा उभारण्यात आला आहे.
अमेरिकेतील कोणत्याही शहर प्रशासनाकडून असा पुतळा उभारण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.
या पुतळ्याचं अनावरण सिएटलच्या महापौर केटी विल्सन आणि भारताच्या महावाणिज्य दूतांच्या हस्ते झालं.
ऑबर्न, टुकविला, नॉर्मंडी पार्क, कर्कलँड, बेलव्यू आणि रेडमंड, अशा अनेक शहरांचे महापौर, लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक उपस्थित होते.
सिएटल हे स्वामी विवेकानंदांचा पूर्णाकृती पुतळा उभारणारं पहिले अमेरिकन शहर ठरलं आहे.
सिएटल इथं दररोज 4 लाखांहून अधिक लोक ये-जा करतात, त्यामुळे स्वामीजींचे विचार जगभरात पोहोचतील.
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) यांच्याकडून सिएटल शहराला देण्यात आलेली विशेष भेट आहे.
भारत-अमेरिका सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रभाव अधोरेखित करणारा हा उपक्रम ठरला आहे.